महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन
लातूर, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्यशासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आलेआहे.याप्रसंगीराष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूरजिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळासुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागीहोता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मेरोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभआयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्याकार्यालयाला किंवा संस्थेला स्वतंत्रपणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करायचाअसल्यास तो सकाळी ७.१५ पूर्वी किंवा सकाळी ९ नंतर आयोजित करावा.*****
Comments
Post a Comment