लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन लातूर, दि. ०८ : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'मार्जिन मनी' योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी लातूरमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून ही कार्यशाळा १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात होईल. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या असून, अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शासन निर्णयाचे अवलोकन करू शकतात. मार्जिन मनी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव ३० एप्रिल २०२६ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करणे आवश्यक आहे. १० एप्रिल रोजी आयोजित या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी सहभागी होऊन योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास