प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी लातूर, दि. ०९ : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना रिलायन्स इंडस्ट्रीज, एच.डी.एफ.सी. बँक आणि गेल (इंडिया) लिमिटेड यांसारख्या देशातील आघाडीच्या २००० कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार असून, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेले बेरोजगार तरुण पात्र आहेत. केवळ मानधनच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींना ६ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, इच्छुकांनी तात्काळ https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. मदतीसाठी तरुण दत्तात्रय कांबळे (९०२८२३८४६५) किंवा लहू भंडारे (८०५५९९२९००) यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत