एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर लातूर, दि. २९ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, लातूर विभागातील आगारांसाठी या उपक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लातूर विभागातील या दौऱ्याची सुरुवात २९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर आगारातून होणार असून त्यानंतर ६ मे रोजी लातूर, १३ मे रोजी औसा, २० मे रोजी अहमदपूर आणि ३ जून २०२६ रोजी निलंगा आगार येथे या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' आयोजित केला जाईल, ज्यामध्ये प्रवासी, विविध प्रवासी संघटना, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या बस सेवेसंबंधीच्या तक्रारी आणि सूचना लेखी स्वरूपात मांडू शकतील. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'कामगार पालक दिन' साजरा करण्यात येणार असून, या सत्रात एसटी कर्मचारी आणि संघटनांचे वैयक्तिक प्रश्न, जसे की रजा मंजुरी, वेळापत्रक आणि प्रशासकीय कारवाई यांवरील तक्रारींचे तात्काळ निराकरण केले जाणार आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन