लातूर येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावा उत्साहात

लातूर येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावा उत्साहात लातूर, दि. १३ : सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लातूर येथील वेद प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या विविध कायदेविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती असल्यास ज्येष्ठ नागरिक आपले जीवन अधिक सुरक्षित आणि स्वाभिमानाने जगू शकतात, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी मंचावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी, आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाशजी घादगीने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाशजी घादगीने लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या मेळाव्याला लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, समाज कल्याण पुरस्कार प्राप्त मान्यवर, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत