लातूर जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना; ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र
शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या १९ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार
या जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे, आता
ही समिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे. या
समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या आणि अल्पसंख्याकांसाठी
सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत अशासकीय स्वयंसेवी
संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव सर्व पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे. हे
प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी
रोड, लातूर या कार्यालयात दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत
सादर करायचे असून, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला
जाणार नाही, असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक
अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे
****
Comments
Post a Comment