लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन लातूर, दि. २० : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नसल्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एकूण ७५ हजार १६७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून, यामध्ये ३८ हजार ४४४ टन संयुक्त खते, १६ हजार ८२ टन सिंगल सुपर फॉस्फेट, ११ हजार ४३६ टन युरिया, ८ हजार ३११ टन डीएपी आणि ८९४ टन एमओपी खताचा समावेश आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनवर 'एल निनो'चा परिणाम होऊन पावसाची अनिश्चितता वर्तविली असल्याने, शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खरेदी करून साठवणूक करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. तालुकानिहाय उपलब्धतेमध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक २९३६ टन युरिया व १८२४ टन डीएपी साठा असून, अहमदपूर (युरिया १५६२, डीएपी ९४२), निलंगा (युरिया १४७३, डीएपी १३४५), औसा (युरिया १३९८, डीएपी ५७०) आणि उदगीर (युरिया ७२६, डीएपी ७३०) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. तसेच चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या तालुक्यांमध्येही खतांचा पुरेसा साठा केंद्रांवर उपलब्ध आहे. जरी आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असली तरी त्याचा देशांतर्गत खत पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खत खरेदी करावी. प्रत्येक कृषी सेवा केंद्रनिहाय उपलब्ध साठा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकृत ब्लॉग लिंकचा किंवा क्यूआर कोडचा वापर करावा, असेही कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन