शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत लातूर, दि. २४ : जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन लातूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी, बारावी, तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व नवीन आणि नूतनीकरण करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर सर्वप्रथम आपला ओळख क्रमांक वापरून महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आपला पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल माहिती अद्ययावत ठेवावी आणि भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला यासह इतर सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात संकलित करून ठेवावीत. शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे ही प्रवेश प्रक्रियेचाच एक भाग असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात तात्काळ जमा करावी, तर महाविद्यालयांनी हे अर्ज विनाविलंब समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास