नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रपरिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नीट पीजी प्रवेश परीक्षा केंद्रपरिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. २५ : राष्ट्रीय परीक्षा एजेंन्सीमार्फत आयोजितनीट पीजी प्रवेश परीक्षा २०२६ ही परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते १२.३० वाजेपर्यंत लातूरजिल्ह्यातील २ परीक्षा केंद्रावर एकसत्रामध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्यापरिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी डॉ. भारतबास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये दोन परीक्षाकेंद्राच्या १०० मीटरच्या परिसरामध्ये परीक्षेच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश जारीकरण्यात आले आहेत.
परीक्षाकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्तव्यक्ती एकत्रितरित्य प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यातयेणर नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडूनशांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षाकेंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ,ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षाकेंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणेव शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणारनाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाईराहील. हे आदेश परीक्षा उपकेंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थीउपकेंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतत्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लाग राहणार नाहीत. हे आदेश ३० ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत लागूराहतील.****
Comments
Post a Comment