लातूर जिल्ह्यात ६४० 'आपले सरकार सेवाकेंद्रां'साठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित
लातूर जिल्ह्यात ६४० 'आपले सरकार सेवाकेंद्रां'साठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित
लातूर, दि. २५ : जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-गव्हर्नन्स विभागामार्फतजिल्ह्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' स्थापन करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यातआली आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्यानिर्देशानुसार, जिल्ह्यातील तालुके, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायतक्षेत्रांमधील एकूण ६४० रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या केंद्रांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्णअसणे आवश्यक आहे. अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी) उत्तीर्णअसावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून, एमएससीआयटी किंवासीसीसीचे प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. अर्जदार संबंधित ग्रामपंचायत किंवाशहरी क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. याशिवाय उमेदवाराकडे आधारकार्ड, पॅन कार्ड,बँक खाते व आवश्यक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. अर्जदारावर नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूककिंवा सायबर गुन्ह्याबाबत कोणताही ठपका किंवा दोष सिद्ध झालेला नसावा.या प्रक्रियेसाठी अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी दिलेल्या पोर्टलला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचीप्रक्रिया २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याचीअंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ०५ वाजेपर्यंत असणार आहे.सेवा केंद्राशी संबंधित सविस्तर जाहिरात, नियम आणि अटी जिल्हा प्रशासनाच्याhttps://latur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांशीकोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नसल्याने अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनीवेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी. या केंद्रांची मंजुरी, निवड प्रक्रिया, केंद्र वाटपआणि इतर सर्व बाबींविषयी अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीयसेतू समितीचे अध्यक्ष यांच्याकडे राखीव राहतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यातआले आहे.***
Comments
Post a Comment