लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळणास व उद्योगवाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळणास व उद्योगवाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण • लातूर जिल्ह्यातील 149.30 किलो मीटरच्या रस्ते विकासासाठी • रेणापूर तालुक्यातील मौ. खरोळा येथे 37 पैकी 22 रस्त्यांचे भुमिपूजन • राज्याच्या रस्ते विकासावर भर, लातूर-नांदेड रेल्वे लाईनसाठी प्रयत्न *लातूर, दि.27(जिमाका):- * लातूर आणि नांदेडचं वेगळं नातं असून विकासाची परंपरा जपणारं आहे.लातूर जिल्ह्याला विकासाबाबतीत झुकतं माप देण्याची परंपरा कायम ठेवणार आहोत. लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळणास व उद्योगवाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिपादन केले. मौ. खरोळा ता. रेणापूर जि. लातूर येथे लातूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खरोळा ता. रेणापूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमं...