Posts

Showing posts from October, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

Image
       लातूर ,   दि.   28 (वि माका) :-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या  https://mpsc.gov.in   व   https://mpsconline.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.           शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

महाबीजचे हरभरा आणि गहू बियाणे रब्बी हंगामासाठी अनुदानावर उपलब्ध

Image
  लातूर , दि. 27 ( जिमाका):- रब्बी-2022 हंगामामध्ये कृषी उन्नती योजनांतर्गत ग्रामबिजोत्पादन कडधान्य योजनेत हरभऱ्याचे दहा वर्षाच्या आतील फुले विक्रम , राजविजय-202 , फुले विक्रांत , ऐ.की.जी. 1109 ( पी.डी.के.व्ही. कांचन), आणि दहा वर्षांवरील जॅकी- 9218 , विजय बियाणे, तसेच ग्रामबिजोत्पादन योजनेतून दहा वर्षांवरील गहू बियाणे कृषी विभाग व महाबीजमार्फत अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. राजविजय-202 , फुले विक्रम , फुले विक्रांत , ऐ.की.जी. 1109 ( पी.डे.के.व्ही कांचन) 20 किलो हरभरा बियाणाच्या प्रत्येक बॅगची मूळ किंमत एक हजार 400 रुपये असून प्रत्येक बॅग 500 रुपये अनुदान आहे. अनुदान वजा केल्यानंतर 20 किलोची बॅग 900 रुपयांना उपलब्ध होईल. दहा वर्षावरील जॅकी-9218 बियाणाच्या 30 किलोच्या प्रत्येक बॅगची मूळ किंमत 2 हजार 100 रुपये असून त्यावरील 600 रुपये अनुदान वजा केल्यानंतर ही 30 किलोची बॅग एक हजार 500 रुपयांना मिळणार आहे. तसेच मूळ किंमत एक हजार 420 रुपये असलेल्या विजय , दिग्विजय बियाणाच्या 20 किलोच्या प्रत्येक बॅगवर 400 रुपये अनुदान असून ही बॅग एक हजार 20 रुपये अनुदानित दराने उपलब्ध आहे. गहू

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Image
लातूर , दि. 27 ( जिमाका):- राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 3) सकाळी अकराला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.           या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, विशेष घटक उपयोजना आणि आदिवासी विकास उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत सप्टेंबरअखेर प्राप्त प्रस्ताव व झालेल्या खर्च आढावा घेण्यात येणार आहे. तसेच सन 2023-24 करिता जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा विषयी चर्चा करण्यात येणार आहेत.
     खाजगी वाहतूकदारांनी अधिक भाडे आकारल्यास होणार कारवाई   लातूर ,   दि. 2 1   ( जिमाका):-   उपप्रा देशिक परिवहन कार्यालयांतर्गत खाजगी वाहतूकदारांनी निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यांच्यावर तरतूदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.                    त्याअनुषंगाने राज्यमार्ग परिवहन महामंडळाने त्या-त्या संवर्गातील वाहनांसाठी भाडेदर निश्चीत केला आहे. सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी बसेससाठी प्रती कि.मी.भाडेदराच्या   50   टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने दि. 27   जुलै   2018   ला  निश्चित  केले आहेत. त्यानुसार शासन निर्णयाप्रमाणे कंत्राटी परवाना वाहनाचे प्रती बस ,   प्रती कि.मी. ,   प्रती आसन कमाल भाडे (रा.प.मंडळाचे भाडे अधिक   50   टक्के धरुन) मार्गदर्शक भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. लातूर ते मुंबईपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 790 रुपये ,  निमआराम किंवा शयनआसनी बससाठी एक हजार 70 रुपये ,  वातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी एक हजार 170 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी ए

लातूर तहसील कार्यालयाची मतदार नोंदणीत समाधानकारक कामगीरी

  लातूर तहसील कार्यालयाची मतदार नोंदणीत समाधानकारक कामगीरी                                                                              लातूर ,  दि. 21 : गेल्या वर्षभरात लातूर तालुका तहसील कार्यालयाने मतदार नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या तब्बल 53 हजार 601 अर्जांवर निर्णय घेवून कार्यवाही केली आहे. यासाठी उत्‍कृष्‍ठ नियोजन व विहीत वेळेत कामकाज पूर्ण केल्याने मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांची मराठवाडा विभागातून राज्‍यस्‍तरावर उत्‍कृष्‍ठ मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने कौतुकाची थाप दिली. भारत निवडणूक आयोग ,  मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार आणि जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तहसिल कार्यालयातील निवडणूक विभाग नियोजनबद्धपणे कामकाज करीत आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 33 हजार 204 प्राप्‍त अर्जावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे. मतदार यादीसोबत आधार क्रमांक जोडणी मोहिमेतही लातूर तहसील कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्‍याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी एक ल
Image
                                                     जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण कार्यालयात दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन   लातूर,दि.21 (जिमाका)-  जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण कार्यालयात झाली. प्राधिकरणच्या सचिव न्या. श्रीमती स्वाती अवसेकर यांनी प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कायदे व न्याय व्यस्थेची माहिती सामान्य लोकांना व्हावी. समाजातील वंचित ,   दिव्यांग आणि अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळावा. दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या योजनांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे न्या. श्रीमती अवसेकर यांनी सांगितले. संवेदना प्रकल्पाचे विशेष शिक्षक तथा  ‘ स्नॅक ’ चे समन्वयक व्यंकट लामजने यांनी दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या युडीआयडी कार्ड ,   निरामय आरोग्य विमा योजना ,   शिष्यवृत्ती योजना , 5   टक्के दिव्यांग निधी ,   समाजकल्याण विभागाच्या योजना ,   केंद्र व राज्य शासनाच्या व

राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 21 नविन परिवर्तन बसेस दाखल उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते उद्घाटन.

Image
  राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात  21 नविन परिवर्तन बसेस दाखल उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते उद्घाटन.          लातूर,दि. 21 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील अंबेजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक दोन येथे 21 नविन परिवर्तन बसेसचे उद्घाटन झाले. या बसमध्ये आरामदायी पुशबॅक सीट आहेत. लवकरच या बसेस टप्प्याटप्प्याने विभागातील विविध मार्गावर धावणार आहेत.            या बसेसचा प्रवास सर्व सवलतीधारकांनाही लागू आहे. या आरामदायी, सुखकर व सुरक्षित बसेस साध्या दरात धावणार असून या बसेसचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चन्ने यांनी केले.           लातूर विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी लातूर विभागात दाखल झालेल्या 21 नविन परीवर्तन आरामदायी बसेस प्रवासी गर्दी असलेल्या परभणी, उस्मानाबाद, उदगीर, सोलापुर व अंबेजोगाई या विविध मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडणार असल्याचे सांगितले.                कार्यक्रमास वरीष्ठ सांख्यिकी अधिकारी (नियंत्रण समि

लातूर जिल्ह्यात झाले दोन लाख 42 हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण

Image
    लातूर जिल्ह्यात झाले दोन लाख 42 हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण   लातूर, दि. 21 : राज्यात लंपी चर्मरोगाचा जनावरांमध्ये होत असलेला प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवून दोन लाख 42 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. उर्वरित जनावरांच्या लसीकरणासाठी 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविली जाणार आहे. लसीकरण झालेल्या पशुधनातही लंपी आजाराची लक्षणे दिसून आली असली तरी ही जनावरे गंभीर होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्यासाठी 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व गाई आणि वासरे यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या पशुधनाचे लसीकरण झालेले नाही, अशा पशुधन मालकांनी त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या नोंदवहीत किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करावयाच्या असून त्यानुसार संबंधित गावांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून

जाणून घेवू या… उच्च शिक्षणासाठी व्याज परतावा योजना…!!

                                                                           जाणून घेवू या… उच्च शिक्षणासाठी व्याज परतावा योजना…!!    राज्य ,   देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेने मंजूर केलेल्या 20 लाख रुपयापर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा देण्याची योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ,   आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे ,  हा योजनेचा उद्देश आहे. राज्यांतर्गत आणि देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी या योजनेत जास्तीत जास्त 10 लाख रुपये कर्ज मर्यादा आहे ,  तर परदेशी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त   20   लाख रुपये कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बँकेकडून वितरीत केलेल्या शैक्षणिक कर्जाच्या मर्यादेत रकमेवरील जास्तीत जास्त   12   टक्क्यापर्यंत रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. राज्यांतर्गत अभ्यासक्रमामध्ये   केंद्रीय परिषद ,   कृष

हासोरी परिसरातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Image
  हासोरी परिसरातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा   लातूर, दि. 21 : निलंगा तालुक्यातील हासोरी बु. आणि हासोरी खु. परिसरात सौम्य भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा घेतला. याबाबतची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, पुनवर्सनचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, निलंगाच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, प्र. तहसीलदार घनश्याम जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. जाधव, गणेश क्षीरसागर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. जी. जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकीब उस्मानी, लातूर पाटबंधारे विभागाचे एस. एम. निटुरे, सुनंदा जगताप, गट विकास अधिकारी ए. बी. ताकभाते यावेळी उपस्थित होते. हासोरी येथील नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा खोल्य
Image
  आयोडीन आहे.. सशक्त जीवनाची कुंजी              भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणतात या अन संस्कृतीची दखल जगभरात घेतली जाते. पण आपल्या देशातच ती लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण धावपळीच्या जीवनात जंक फूड व फास्ट फूडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परिणामी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन त्यांचे शरीर हे आजाराचे माहेर घर बनत चालले आहे. त्यासाठी आयोडीन हे अत्यंत महत्वाचे आहे त्यावर प्रकाश टाकणारा लेख...!!         आपला आहार हा सकस व समतोल असावा जेणेकरून त्यातून आपल्याला कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे हे पोषक घटके मिळतील. आज आपण खनिजा बद्दल बोलायचं झाल तर आपल्या शरीराला  थोड्या प्रमाणात लागणारा व तेवढाच महत्वाचा घटक म्हणजे आयोडीन होय.           21 ऑक्टोबर हा दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यामागचा उद्देश म्हणजे जनतेस दैनंदिन आहारामधील आयोडीनचे महत्व समजावे हा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण 21 ऑक्टोबर 2022 रोजी 'जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस" म्हणून साजरा करणार आहोत.         आयोड

जिल्हा कारागृहात संपन्न झाला ‘एकमेकां साहय करु ताण-तणाव दूर करु’ उपक्रम

  जिल्हा कारागृहात संपन्न झाला ‘एकमेकां साहय करु ताण-तणाव दूर करु’ उपक्रम          लातूर,दि.20 (जिमाका)- “ 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो" या वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे बीद्र वाक्य हे मानसिक आरोग्य आणि कल्याण प्राथमिकता तुमची आमची नव्हे तर सर्वाची" "Making Mental Health and wellbeing for all a global Priority" आहे.             या दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह लातूर येथे मानसिक आरोग्य व ताण सणाव व्यवस्थापन व सयदेविषयक मानसिक आरोग्य मार्गदर्शन या विषयी न्यायलयीन पद्यानासाठी एकदिवसीय डॉ. लक्ष्मण देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. पाठक (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. मोनिका पाटील (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती एस. डी. अवसेकर सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण लातूर, सावंत कारागृह अधिक्षक डॉ. शितल तळीखेडकर मानस