लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्यांची नियुक्ती*

                                                *लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील*

*अशासकिय सदस्यांची नियुक्ती*

 

*लातूर दि.19(जिमाका)*  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक विभाग शासन निर्णय क्र. 2022/ प्र.क्र.19/ग्रासं 2 दि. 29 ऑगस्ट 2022 मधील निर्देशानुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील 28 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणे करावयाची आहे. सदरील 28 अशासकीय सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती गठित करण्यात आली असून, तहसील कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड करावयाचे प्रवर्ग निहाय अशासकीय सदस्यांच्या निवडीचा तपशिल पूढील प्रमाणे आहे.

प्रवर्ग व सदस्य संख्या- जिल्हा परिषद -2, मनपा / नगर पालिका-2, पंचायत समिती-2, कृषी उत्पन्न बाजार समिती-2, ग्राहक संघटना- 10, शाळा / महाविद्यालय-2, वैद्यकीय व्यवसायिक-2, व्यापार व उद्योग- 2, पेट्रोल व गॅस-2,  व शेतकरी- 2 असे एकूण 28 सदस्य संख्या आहे.

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड करावयाचे प्रवर्ग निहाय तपशिल जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या www.iatur.nic.in  या संकेस्थळावर जाहिरातीचा सविस्तर तपशिल प्रसिध्द केलेला आहे. ईच्छूक उमेदवारांनी जाहिरातीच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जाहीरातीत नमुद केलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची निवड जिल्ह स्तरीय समिती मार्फत करण्यात येईल. जिल्हा स्तरीय समितीने निवड केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तींच आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्गमित केले जातील.

यापुर्वी दिनांक 21 जानेवारी, 2022 च्या प्रसिध्दीपत्रकानुसार अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त चालू वर्षाचे पोलीस  विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सद्दस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा सदस्यांचा कालावधी संपलेला आहे. सदरची पदे ज्यावेळी नविन जि.प. व मनपा निवडणुका होतील त्यानंतर नव्याने जाहिरात काढली जाईल.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                       ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु