सांस्कृतिक क्षेत्रात जिल्ह्यातील युवकांनी राष्ट्रीय पातळी लातूर जिल्हयाचे नाव लौकीक करावे - अरविंद लोखंडे अतिरिक्त जिल्हाधिकारी*

                                                *सांस्कृतिक क्षेत्रात जिल्ह्यातील युवकांनी*

*राष्ट्रीय पातळी लातूर जिल्हयाचे नाव लौकीक करावे*

                                                  *- अरविंद लोखंडे अतिरिक्त जिल्हाधिकारी*

 

 

*लातूर दि.19(जिमाका)*  ग्रामिण भागातील युवकांतील कलागुणांना योग्य ते व्यासपिठ मिळवून देण्याचे कार्य नेहरु युवा केन्द्र करत आहे. आज लातुर जिल्ह्यातील युवक प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. सांस्कृतिक क्षेत्रात देखील युवकांनी राष्ट्रीय पातळीवर लातूर जिल्ह्याचे नाव लौकीक करावे, असे प्रतिपादान अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखडे यांनी केले.

नेहरू युवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा कार्यक्रम व कीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत केन्द्र लातुर मार्फत लातुर जिल्हास्तरीय युवा उत्सव राजर्षी शाहु महाविद्यालय लातुर येथे यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. सदरील युवा उत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

युवा उत्सवात, युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, युवा लेखक कविता स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धा, युवा संवाद भारत 2047 आदी स्पर्धा व कार्यक्रम करण्यात आले होते.

या युवा महोत्सवात जिल्ह्यातील जवळपास 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. समारोप प्रसंगी व्यासपिठावर प्रमुख पहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन अध्यक्षस्थानी राजर्षी शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाने तसेच उपप्राचार्य डॉ. सदाशिव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक  डॉ. कल्याण सावंत, जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, संजय ममदापुरे, जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य   संगमेश्वर जनगावे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात युवक हा देशाचा मुख्य आधारस्तंभ असून देशात विकासात्मक क्रांती घडवून आणण्याची शक्ती युवकांत आहे. नेहरु युवा केन्द्राच्या माध्यमातून युवकांच्या सर्वागीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामिण भागातील युवकांच्या कलागुणांना योग्य तो वाव मिळवुन द्यावा या उद्देशाने देशभर विविध पातळीवर युवा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असुन लातुर जिल्ह्यातील युवकांनी यात उत्सफूर्तपणे सहभाग घेतला आहे. अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी साक्षी सोमय्या यानी दिली.

विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरुपात रोख पारीतोषीक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आदीचे वितरण करुन सन्मानीत करण्यात आला. अध्यक्षीय समारोप राजर्षी शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाने यांनी केला. तर सुत्रसंचलन मगर नवनाथ व प्रणव बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय ममदापुरे यांनी केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रा. कल्याण सावंत प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सारंग कदम, स्वयंसेवक पाटील रोहिणी, इम्पले अविनाश, नागरगोजे अविनाश, परमेश्वर बिरादार, खुशाल बिरादार, वेळीकर भिमाशंकर, रविकांत गुजिसब, प्रशात ज्ञानेश्वर पवार, मुजाहीद शेख, रोहित यांनी विशेष परिश्रम घेतले.

****  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु