ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
*ज्येष्ठ नागरिक दिन साजरा*
*लातूर दि.1(जिमाका):-*
केंद्र शासनाच्या ज्येष्ठ
नागरिकाच्या कल्याणासाठी आई-वडिल व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी
अधिनियम 2007 पारीत केला असून सदरचा अधिनियम शासनाने दि.01 मार्च 2009 पासून लागू
केला आहे. केंद्र शासनाचे अधिनियमाचे अनुषंगाने राज्य शासनाने दि. 23 जून 2010
अन्वये नियम 2010 पारीत केलेला आहे.
दरवर्षी दि. 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतीक ज्येष्ठ
नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 1
ऑक्टोबर,2022 रोजी सकाळी
10.30 वाजता वेद प्रतिष्ठाण वाचनालय, कै. गुरुशांत अप्पा लातूर
सभागृह, लातूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचे अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिनाचे
आयोजन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, यांचे हस्ते विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले व त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आले. तद्नंतर मुख्य कार्यक्रमा निमित्त महात्मा फुले, राजर्षी शाहू
महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व
दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार
करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये मा. मुख्य निवडणूक आयुक्त, भारत सरकार
यांचे स्वाक्षरीचे सन्मापत्र लोकशाही बळकट करण्यासाठी लोकशाही प्रक्रियेमध्ये
दिलेल्या सहभागाबद्दल उपस्थित जेष्ठ नागरिक मतदार यांना सुपूर्द करण्यात आले,
व निराधार पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र
उपस्थित 5 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य, विविध योजना,
जेष्ठांचे समाजातील महत्व व त्यांचे योगदान याबाबत सविस्तर विचार मांडले.
या कार्यक्रमास प्रादेशिक
उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर अविनाश देवसटवार, जिल्हा माहिती
अधिकारी युवराज पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज करण्यात अधिकारी सुनिल
खमितकर, कार्यकारी अभियंता, नवनाथ
केंद्रे, लातूर महानगरपालिका, बी.आर.पाटील, आर.बी.जोशी, प्रकाश धादगिने व इतर
ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध पदाधिकारी, मोठया संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित
होते. तसेच प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील
कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.
Comments
Post a Comment