सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंबांना पात्र लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी वस्तुचे वाटप करावेत -जिल्हा पुरवठा अधिकारी सदशिव पडदुणे
*सार्वजनिक
वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंबांना*
*पात्र
लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी वस्तुचे वाटप करावेत*
*-जिल्हा पुरवठा अधिकारी
सदशिव पडदुणे*
§
*सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत तक्रार
निवारण क्रमांक - ०२३८२२९५८०९ वर संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा*
*लातूर, दि.12(जिमाका):-* राज्यातील सार्वजनिक
वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती
विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी जिल्ह्यातील पीएल (केशरी)
शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक
लिटर पामतेल या ४ जिन्नसाचा समावेश असलेला एक शिधाजन्नस संघ प्रति शिधापत्रिकास ई-पोस
प्रणालीद्वारे प्रति संच रुपये शंभर या दराने वितरीत करण्याबाबत शासन निर्णय दिनांक
४ ऑक्टोबर, २०२२ रोजी पारित करण्यात आलेला आहे.
लातूर
जिल्हयात 4 लाख 18 हजार 247 लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून जिल्हा पुरवठा कार्यालयाचे
नियोजन आलेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी या
वस्तुचे वाटप करण्यासंदर्भात सर्व पुरवठा नायब तहसीलदारांची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
(VC) घेवून तशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदरील वस्तूंची मागणी शासनाकडे नोंदवली
आहे. संपूर्ण राज्यभरासाठी हा निर्णय असल्यामूळे त्याअनुषंगाने नुकतीच पुरवठा विभागाच्या
सचिवांनीही व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे सर्व जिल्ह्याकडून शिधापत्रका जिन्नसांचे मागणी
नोंदविण्याचे आवाहन केले. त्यानूसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात या विषयावर नियोजन
सुरू होते. तर शासनाकडून प्राप्त सुचनेवरून पुरवठा कंत्राटदार महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह
कन्झ्युमर्स फेडरेशनलाही कळविण्यात आले आहे.
पुरवठा
कंत्राटदाराने शिधावस्तू संच संबंधित तालुक्याच्या गोदामापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
या संचात समाविष्ट वस्तू एफ.एस.एस.ए.आय मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल अधिस्वीकृत
प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कत्रांटदाराकडून प्राप्त करून घेऊन त्यानंतरच - शिधावस्तू
संच स्वीकारावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारल्या जाणा
नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुरवठा विभागाचे उपसचिव ने प्र. मानकामे यानी
दिले आहेत.
याबाबत
तक्रार निवारण क्रमांक - ०२३८२२९५८०९ वर संपर्क साधण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव
पडदुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment