वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूरतंर्गत औसा येथे होणार पाणी गुणवत्ता तपासणी कार्यालय
*वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूरतंर्गत*
*औसा येथे होणार पाणी गुणवत्ता तपासणी कार्यालय*
*लातूर दि.19(जिमाका)* वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूर अंतर्गत पिण्याचे पाणी गुणवत्ता तपासणीसाठी असलेली औसा येथील उपविभागीय प्रयोगशाळेला राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण बोर्ड (NABL) यांच्याकडून अधिकृत मान्यता दि. 14 ऑक्टोबर,2022 रोजी प्राप्त झालेली आहे.
या प्रयोगशाळेत आरोग्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या पाणी या घटकाचे रासायनिक व जैविक पृथ:करण केले जाते. यामध्ये राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण बोर्ड (NABL) यांच्याकडून रासायनिक पृथ:करणासाठी pH, गढुळता, कठिणपणा, रंग, चव, गंध, क्लोराईड, अल्कलिनिटी, टीडीएस (T.D.S.), कॅलशिअम व मॅग्नेशिअम या घटकांसाठी मान्यता मिळालेली आहे. या सर्व घटकांची तपासणी करून पाणी पिण्यास योग्य किंवा अयोग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले जाते.
सध्यस्थितीत लातूर जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लातूरतं र्गत असलेल्या जिल्हा प्रयोगशाळा, लातूर व उपविभागीय प्रयोगशाळा, औसा या दोन प्रयोगशाळेस राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण बोर्ड (NABL) यांच्याकडून अधिकृत मान्यता मिळालेली आहे. याबद्दल लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी या प्रमाणपत्राबद्दल जिल्हा प्रयोगशाळा, लातूर व उपविभागीय प्रयोगशाळा, औसा येथील कर्मचाऱ्याचे अभिनंदन केलेले आहे.
Comments
Post a Comment