सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेतंर्गत अर्ज महाडिबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

 

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेतंर्गत अर्ज

महाडिबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

लातूर, दि.11(जिमाका)  महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड व लातुर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजन व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र २०२२-२३ या सत्राचे ऑनलाईन अर्ज भरणेसाठी https://mahadbtmahait.gov.in हि प्रणाली दिनांक २१सप्टेबर, २०२२ पासून कार्यान्वीत झाली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणेसाठी निर्देश आहेत.

जिल्हयातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनेचे सन २०२२-२३ या सत्रातील (fresh) नविन तथा (Renewal) नुतनीकरण अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात यावे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज भरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सुचना फलकावर सुचना लावून व वर्गामध्ये नोटीस फिरवून व जनजागृती करुन विद्यार्थ्यांना अवगत करावे. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबधीत महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी. याबाबत विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्याकरीता https:// mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज सादर करण्याचे आवाहन औरंगाबाद एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा