पदोन्नतीनंतर प्रशासकिय गतीमानता वाढवा -मुख्य कार्यकारी अधिकारी -अभिनव गोयल

                                            पदोन्नतीनंतर प्रशासकिय गतीमानता वाढवा

                         -मुख्य कार्यकारी अधिकारी -अभिनव गोयल

 

*लातूर दि.19 (जिमाका)* लातूर जिल्हा परिषद अंतर्गत प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखतानिर्णयक्षमता तसेच पारदर्शकता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम व गतीमान प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद लातूर अंतर्गत दि.१७ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या निवडसमितीद्वारे विविध संवर्गातील एकुण-६२ कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचा-यांना पदस्थापना देण्यासाठी दिनांक १९ ऑक्टोंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली असून समुपदेशानावेळीच संबधीत कर्मचा-यांना पदस्थापनेचे आदेश निर्गमित आले आहेत.

     सर्व विभागांत विविध संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येते. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत विविध संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणा-या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यासाठी दि.१७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी पदोन्नतीनिवड समितीची बैठक आयोजित करुन एकुण-६२ कर्मचा-यांची पदोन्नतीसाठी निवड करण्यात आली. असून सामान्य प्रशासन विभाग-वरिष्ठ सहाय्यक-६, कनिष्ठ सहाय्यक-८ असे एकुण-१४पंचायत विभागातील ग्रामविकास अधिकारी-एकुण-२कृषी विभागातील विस्तार अधिकारी (कृषी) एकुण-२अर्थ विभागातील सहाय्यक लेखाधिकारी-१,कनिष्ठ लेखाधिकारी-२वरिष्ठ सहाय्यक लेखा-४ असे एकुण-७पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी-३वृणोपचारक-९ असे एकुण-१२, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक-४,आरोग्य सहाय्यक(पुरुष)- ११,आरोग्य सहाय्यक (महिला)-१० असे एकुण-२५, असे एकुण-६२ कर्मचा-यांची पदोन्नती करण्यात आली.

    या समुपदेशन प्रक्रिया ही मुख्य कार्यकारी अभिनव गोयल,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, तसेच संबधीत विभागातील खातेप्रमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पं.) दत्तात्रय गीरी, जिल्हा कृषी अधिकारी एस.आर.चोलेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर.डी.पडिले, जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही.वडगावे यांचे उपस्थितीत पार पडली.

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा