9 ते 13 ऑक्टोबर या कलावधीत उस्मानाबाद टपाल विभागात राष्ट्रीय टपाल सप्ताह होणार

 

9 ते 13 ऑक्टोबर या कलावधीत उस्मानाबाद

टपाल विभागात राष्ट्रीय टपाल सप्ताह होणार

 

*डाक विभागाच्या विविध योजना पोहचण्यांसाठी योजना शिबीराचे आयोजन*

 

  *लातूर,दि.6(जिमाका)* :- युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त डाक विभाग दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो, ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर पासून होते.

यंदाच्या जागतिक टपाल दिनाची संकल्पना पोस्ट फॉर प्लॅनेट आहे. या वर्षाच्या टपाल सप्ताहामध्ये  9 ऑक्टोबर 2022 ते 13 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत उस्मानाबाद डाक विभागाने समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत डाक विभागाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी विविध खाते उघडणे शिबिरे, टपाल जीवन विमा कॅम्प, आधार कॅम्प, फिलाटली सेमिनार, सामाजिक सुरक्षा योजनांवरील शिबिरे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

 सर्व जनतेला कळविण्यात येते की त्यांनी या कालावधी मध्ये आपल्या जवळील टपाल कार्यालयाला भेट देऊन डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन डाक अधिक्षक, उस्मानाबाद विभाग मुख्यालय लातूर, डॉ. बी. एच. नागरगोजे, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले  आहे.

 

                                                             ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा