बाभळगाव ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर संपन्न
*बाभळगाव
ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर संपन्न*
लातूर, दि.11(जिमाका) ग्रामीण रुग्णालय बाभळगाव स्तन व योनीमुख कर्करोग निदान शिबीर ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे स्तन व योनीमुख कर्करोग निदान शिबीराचे आयोजन केले होते.
श्रीमती
वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सदरील शिबीराचे उदघाटन केले. जिल्हाधिकारी बी. पी.
पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल व तसेच विलासराव देशमुख शासकिय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित होते.
या
शिबीरामध्ये एकुण ३२७ महिला रुग्णांनी सहभाग नोंदविला, सर्व रुग्णांची तज्ञ वैदयकिय
अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आल्या. पॅप स्मेअर - ९२, व्ही. आय. ए. ९७. एफएनएसी
०४, रक्त तपासणी व योग्य औषधी उपचार करण्यात आले. तपासण्याचे अहवाल प्रलंबित आहेत.
श्रीमती
वैशालीताई देशमुख यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल अधिकाधिक दक्ष राहण्याबाबत
मार्गदर्शन करुन महिलांच्या संदर्भातील कोणतेही आजार उद्भवल्यास किंवा शरिरावर गाठ
आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. जेणेकरुन कॅन्सरसारखा दुर्धर आजारही निदान झाल्यास
उपचार केले जावू शकतात.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सदरील
रुग्णाचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतुन करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. श्रीमती मीरा चिंचोलकर, डॉ श्रीमती सारीका देशमुख, डॉ. श्रीमती वैशाली दाताळ, डॉ.
श्रीमती जाजु डॉ. काळे व इतर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा
परीषद लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक लातूर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परीषद
लातूर, वैदयकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांची, हे शिबिर यशस्वी करण्याचे सामुहिक
प्रयत्न केले.
****
Comments
Post a Comment