लातूर तहसील कार्यालयाची मतदार नोंदणीत समाधानकारक कामगीरी

 लातूर तहसील कार्यालयाची मतदार नोंदणीत समाधानकारक कामगीरी

                                                                          

लातूरदि. 21 : गेल्या वर्षभरात लातूर तालुका तहसील कार्यालयाने मतदार नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या तब्बल 53 हजार 601 अर्जांवर निर्णय घेवून कार्यवाही केली आहे. यासाठी उत्‍कृष्‍ठ नियोजन व विहीत वेळेत कामकाज पूर्ण केल्याने मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांची मराठवाडा विभागातून राज्‍यस्‍तरावर उत्‍कृष्‍ठ मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने कौतुकाची थाप दिली.

भारत निवडणूक आयोगमुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार आणि जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तहसिल कार्यालयातील निवडणूक विभाग नियोजनबद्धपणे कामकाज करीत आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 33 हजार 204 प्राप्‍त अर्जावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे.

मतदार यादीसोबत आधार क्रमांक जोडणी मोहिमेतही लातूर तहसील कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्‍याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी एक लाख 83 हजार 237 मतदारांनी ऐच्छिकपणे आधारची माहिती मतदार यादीसोबत जोडलेली आहे.  लातूर तालुक्‍यातील मतदार यादीमध्‍ये 25 हजार 848 मतदारांचे दुबार नाव असल्‍याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले होते. याबाबत पडताळणी करुन 11 हजार 726 दुबार मतदारांची नावे वगळण्याची व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने यावर्षी नव्‍यानेच घेतलेल्या मतदार ओळखपत्र पोस्टाद्वारे वितरीत करण्याच्या उपक्रमात लातूर तालुक्‍यातील 23 हजार 170 मतदारांचे ओळखपत्र पोस्‍टाव्‍दारे वितरीत करण्‍यात आले आहे. संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम  2023 अंतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यासाठी लातूर तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्राची पडताळणी करुन 533 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्‍यात आले. यामध्‍ये मतदान केंद्राचे ठिकाण बदल 8 मतदान केंद्राचे नावात बदल 6 व 1400 पेक्षा जास्‍त मतदार झालेले मतदान केंद्राचे विभाजन करुन 25 नविन मतदान केंद्र निर्माण करण्‍याचा प्रस्‍ताव मा. निवडणूक आयोगाकडे सादर करण्‍यात आला.

आयुक्‍त तथा मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदार संघ औरंगाबाद यांनी शिक्षक मतदार संघाची मतदार नोंदणीसबंधी अधिसूचना प्रसिध्‍द केलेली असून आतापर्यंत एक हजार 879 शिक्षक मतदारांचे अर्ज प्राप्‍त झाले आहेत.

मतदार नोंदणी आणि मतदार यादी दुरुस्तीविषयक कामासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी.उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदेलातूरचे उपविभागीय अधिकारी सुनील यादवऔसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्‍वप्निल पवारनिवडणूक नायब तहसीलदार कुलदिप देशमुख यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

                                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु