विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे "जागतिक संधिवात दिन" साजरा

 *विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे*

*"जागतिक संधिवात दिन" साजरा*

          *लातूर दि.19 (जिमाका)*   संधिवात या गंभीर आरोग्य स्थितीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी जागतिक संधिवान दिवस पाळला जातो. या अनुषंगाने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे १२ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोहिनेअंतर्गत, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे जागतिक संधिवात दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णांना आजारासंबंधित माहिती उपलब्ध उपचार पद्धती व घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

          संधिवात हा दीर्घकाळ चालणारा एक गंभीर आजार आहे. एक किंवा अधिक सांध्यामध्ये वेदना होणे, सूज येणे. साध्यांच्या हालचाली करण्यास बाधा येणे तसेच प्रभावित सांध्यांमध्ये वाकडेपणा येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. यासाठी दीर्घकाळ औषधोपचार भौतिक उपचार करावे लागतात. गरज पडल्यास शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख याची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली. तसेच उपअधि मंगेश सेलूकर व डॉ उमेश लाड, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ रणजीत हाकेपाटील, त्वचारोग विभागप्रमुख डॉ अजय ओव्हाळ व वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोषकुमार डोपे यांचीही उपस्थिती होती.

             या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ व्यंकट वडगावे व डॉ रोहन अकोसकर यांनी केली. डॉक्टर प्रशांत घुले यांनी संचिवात या रोगाबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित रुग्णव नातेवाईकामध्ये जनजागृती केली. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ रणजीत हाकेपाटील यांनी आजाराची प्रमुख कारणे, लक्षणे उपचार व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. त्वचारोग विभागप्रमुख डॉ. अजय ओव्हाळ यांनी जीवनशैलीतील बदल व आहाराबद्दल मार्गदर्शन केले.अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी लोकांमधील जनजागृती ही काळाची गरज आहे. याचे महत्व पटवून दिले तसेच रुग्णांना माहिती पुस्तिकेचे वाटप केले. डॉ. विजय वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले व शासकीय रुग्णायातील उपलब्ध्‍ सेवेचा लाभ घेण्यासंबंधी रु

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा