जिल्हा कारागृहात संपन्न झाला ‘एकमेकां साहय करु ताण-तणाव दूर करु’ उपक्रम

 जिल्हा कारागृहात संपन्न झाला

‘एकमेकां साहय करु ताण-तणाव दूर करु’ उपक्रम

         लातूर,दि.20 (जिमाका)- 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो" या वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे बीद्र वाक्य हे मानसिक आरोग्य आणि कल्याण प्राथमिकता तुमची आमची नव्हे तर सर्वाची" "Making Mental Health and wellbeing for all a global Priority" आहे.

            या दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह लातूर येथे मानसिक आरोग्य व ताण सणाव व्यवस्थापन व सयदेविषयक मानसिक आरोग्य मार्गदर्शन या विषयी न्यायलयीन पद्यानासाठी एकदिवसीय डॉ. लक्ष्मण देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. पाठक (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. मोनिका पाटील (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती एस. डी. अवसेकर सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण लातूर, सावंत कारागृह अधिक्षक डॉ. शितल तळीखेडकर मानसोपचार तज्ञ जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, डॉ. बनशेलकीकर वैद्यकीय अधिकारी, सांगळे कारागृह अधिक्षक, श्रीमती सरिता शेंडे मानसशास्वज्ञ राजाभाऊ घुले सामाजिक कार्यकता कैलास स्वामी सामाजिक परिचारक व सर्व जिल्हा कारागृह कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंत  कारागृह अधिक्षक यांनी वाढल्या मानसिक आजाराबाबत व निद्रानाश व बदलत्या जीवनशैलीबाबत माहिती दिली, डॉ. शितल तळीखेडकर मानसोपचार तज्ञ यांनी आयुष्यात येणा-या तणावाला कसे सामोरे जायचे व हसत हसत ताण कसा कमी करावा व आहार विहार निद्रा मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले, श्रीमती सरिता शेडे मानसशास्त्रज्ञ यांनी योगा प्राणायाम व मानसिक उपचार व मानसिक रोगतून मुक्त जीवन जगावे याबाबत मार्गदर्शन केले.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्हा कारागृह अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर अधिकारी व कर्मचारी टीम यांनी परिश्रम घेतले.

 

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु