जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उप-परिसर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "भूकंपाच्या तयारीत तरुणांची भूमिका" या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ उप-परिसर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने
"भूकंपाच्या तयारीत तरुणांची भूमिका" या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
*लातूर, दि.12(जिमाका):-* जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण,जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्स, स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "Role of
Youth in Earthquake Preparedness" या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा
दि. १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी (सकाळी १०.०० ते दु. २.०० वाजेपर्यंत) पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांकरीता
आयोजित करण्यात आली आहे.
लातूर
जिल्ह्यात मागील काही दिवसांत होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा
भूकंप पूर्वतयारीच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहे. सदरील कार्यशाळा ही झूम अॅपवरून
जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांचे सबस्क्रिप्शनद्वारे झूम
मिटिंग आयोजित करण्यात आली आहे. याचे प्रसारण युट्युब व फेसबुक लाईव्ह करण्यात येणार
असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment