महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत 15 उमेदवारांचे सादरीकरण स्टार्टअपमध्ये सहभाग नोंदवून अभिनव संकल्पना राबवाव्यात -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे प्रतिपादन*

 

*महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत 15 उमेदवारांचे सादरीकरण*

*स्टार्टअपमध्ये सहभाग नोंदवून अभिनव संकल्पना राबवाव्यात*

*-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे प्रतिपादन*


लातूर दि.14 (जिमाका)  ज्या युवकांनी या स्टार्टअपमध्ये भाग घेतला, पण म्हणावं तस यश मिळालं नाही त्यांनी न डगमगता अभिनव संकल्पना राबवून पुन्हा प्रयत्न करावा. यश निश्चित मिळेल, कोणतेही उद्योग करतांना यशाची हमी ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.


राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील दुसरा टप्पा-जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, औसा रोड, लातूर येथे संपन्न झाले.


या कार्यक्रमास पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य विशाल नितनवरे, विलासराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी प्राध्यापक डॉ.बी.एन.आगलावे, क्लिनींग प्रोडक्टस सेलर ॲन्ड हाऊस किपींग सर्विस प्रोवायडर श्रीराम एंटरप्रायजेस आनंद दिक्षीत, जिल्हा उद्योग केंद्रांचे व्यवस्थापक जी.एम.पवार, जिल्हा लातूर लघु उद्योग भारती वरिष्ठ उपाध्यक्ष शामसुंदर मानधना आदिंची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस सदर सत्राच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, लातूर, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त बालाजी मरे, महात्मा गांधी नॅशनल फेलो वेदांत पाटील यांनी स्टार्टअप विषयी माहिती दिली.

या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, ऊर्जा, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इ. अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात आली.

या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणीकृत 25 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी संकल्पना सादरीकरण केले. जिल्ह्यामधून पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे रु.25 हजार ,रु.15 हजार  व रु.10 हजार पारितोषिक मिळणार आहे. तसेच त्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु