मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार; 31 ऑक्टोबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करावेत -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

 

शिक्षण,क्रीडा,कला, संस्कृती, समाजसेवा क्षेत्रात तसेच शौर्य आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या

मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार; 31 ऑक्टोबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करावेत

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

*लातूर, दि.12(जिमाका):-* जिल्ह्यातील शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रांतील तसेच अपवादात्मक परिस्थितीतील शौर्य आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुलांना (PMRBP) पंतप्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन केले आहे.

यावर्षी 26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' पूर्वी पुरस्कारांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. हा पुरस्कार महिला व बाल विकास केंद्रीय मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येतो. या वर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारासाठी https://awards.gov.in/ या पार्टलवर पुरस्कारासाठी दिनांक 1 ऑक्टोबर, 2022 पासून अर्ज प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ती दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे.  तसेच, ज्या मुलांनी उल्लेखनीय काम केले आहे, अशांनी अर्ज पोर्टलद्वारे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु