लातूर येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
लातूर येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
लातूर,दि. 20 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त नुकतेच ‘मानसिक आरोग्य व ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयी कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
बिडवे इंजिनिअरींग कॉलेजचे प्र. प्राचार्य खटोड, इलेक्ट्रीक विभागाचे प्रमुख प्रा. पटनाईक, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. सोलापूरकर, विद्यार्थी संघटना प्रतिनिधी श्री. पुजारी, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमच्या श्रीमती सरिता शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती शेंडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये होणारे मानसिक आजार, निद्रानाश व बदलत्या जीवनशैली, ताणतणाव इत्यादीबाबत माहिती दिली. आयुष्यात येणाऱ्या तणावाला कसे सामोरे जावे, मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
****
Comments
Post a Comment