रपरिस्थिती हाताळण्यासाठी नागझरी येथे रंगीत तालीम: उदगीर आणि अहमदपूर येथील पथकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नवीन रेस्क्यू बोटींचे वितरण ▪ जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज यांनी स्वतः चालवली रेस्क्यू बोट

 

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नागझरी येथे रंगीत तालीम: उदगीर आणि अहमदपूर येथील पथकांना

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नवीन रेस्क्यू बोटींचे वितरण

जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज यांनी स्वतः चालवली रेस्क्यू बोट


लातूर दि.15 (जिमाका):- नागझरी बरेज येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत जिल्ह्यास घेतलेल्या नवीन बोटींची तपासणी व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी शोध व बचाव पथक उदगीर आणि अहमदपूर यांना एक-एक नवीन बोट व इतर अनुषंगिक शोध व बचाव साहित्य जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिपूर्ण करण्यासाठी व सदरील पथक अधिक क्षमतेने कार्य करण्याच्या दृष्टीने व आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व तालुका स्तरीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सदरील पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बी.पी. यांनी सांगितले. यावेळी सदरील रेस्क्यू बोटी व इतर अनुषंगिक शोध व बचाव साहित्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. साकेब उस्मानी, लातूर पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता आर.के.पाटील, लातुरचे अग्निशमन अधिकारी शेख जाफर, उदगीरचे अग्निशमन अधिकारी श्री. विशाल आलटे, अह्माद्पुरचे प्र. अग्निशमन अधिकारी संभाजी भालेराव, कैलास, मंडळ अधिकारी टी.डी. चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे श्रीराम वाघमारे, किरण जाधव ई. उपस्थित होते.

उदगीर आणि अहमदपूर यांना रेस्क्यू बोटींचे वितरण


यावेळी बोलत असताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यास आमचे प्राधान्य असून कोणतीही आपत्ती जिल्ह्यात उद्भवल्यास स्थानिक पातळीवर / तालुकास्तरावरील यंत्रणेच्या माध्यमातून त्या आपत्तीस प्रतिसाद देणेकरिता पथकांनी सक्षमपने काम करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत स्थापन करण्यात आलेल्या शोध व बचाव पथकानी मान्सून कालावधीत उत्कृष्ट कामे केली असून आवश्यकतेनुसार त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल असे यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.

जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज यांनी स्वतः चालवली रेस्क्यू बोट


याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत जिल्ह्यास घेतलेल्या नवीन बोटींची तपासणी व रंगीत तालीम घेण्यात आली यामध्ये जिल्हाधिकारी यांनी रेस्क्यू बोटीत बसून माहिती घेतली व त्यांनी स्वतः रेस्क्यू बोट चालवली तसेच शोध व सुटका तंत्रांची माहिती घेतली.


या रंगीत तालीमीस नागझरी, इंदरठाणा व परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्य्येने उपस्थित होते. ही रंगीत तालिम जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेनुसार व निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. साकेब उस्मानी यांनी संचलित केली.

सदर रंगीत तालिमीच्या यशस्वीतेसाठी लातूर अग्निशमन विभागाचे श्री. आनंद शिंदे, दिलीप कांबळे, राधाकिशन कासले, होमगार्ड अनंत भालेराव, लालासाहेब क्षीरसागर, ओ.बी.एम मेकानिक रफिक शेख, उदगीर अग्निशमन विभागाचे रत्नदीप पारखे, संजय क्षीरसागर, उमाकांत गंडारे, उत्कर्ष कांबळे अश्विन गायकवाड, राजकुमार चामले, अहमदपूर अग्निशमन विभागाचे कैलास कांबळे, अजित लाळे, प्रशांत गायकवाड, प्रकाश जाधव ई. कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

****





Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा