सन 2022-23 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नुतणीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

 

सन 2022-23 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी

महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नुतणीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

 

*लातूर दि.4(जिमाका):-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन 2022-23 मध्ये नवीन व नुतणीकरण अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झालेले आहे यासाठी विद्यार्थ्याना https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरता येणार आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडिबीटी पोर्टलमार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी,परिक्षा फी,व्यावसायिक पाठयक्रमांस प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग,तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या प्रतिवर्षीच्या अर्जाची संख्या लक्षात घेता सदरचे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचा निर्णय विभागानी घेतला आहे.

अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पूढील प्रमाणे- कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज-दि 22सप्टेंबर 2022 ते दि. 08ऑक्टोबर,2022, नुतणीकरण अर्ज दि.22 सप्टेंबर,2022 ते दि.15 ऑक्टोबर,2022, वरीष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज दि.22 सप्टेंबर, 2022 ते 20 ऑक्टोबर, 2022 नुतणीकरण अर्ज दि.22 सप्टेंबर, 2022 ते दि. 15ऑक्टोबर 2022, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज दि.22 सप्टेंबर 2022 ते दि.7 नोव्हेंबर,2022, नुतणीकरण अर्ज दि.22 सप्टेंबर, 2022 ते दि.31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आहे.

 लातूर जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विना अनुदानित  महाविद्यालयांनी उपरोक्त वेळापत्रका प्रमाणे अर्ज भरून घ्यावेत. विहीत मुदतीत अर्ज न भरल्याने एखादा विद्यार्थी वंचित राहील्यास त्या विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय दि.01 नोव्हेंबर, 2003 नुसार अर्जाची पडताळणी करावी व पात्र अर्ज जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, एस.एन.चिकुर्ते, लातूर यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

          ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापुर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करू नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नुतणीकरण केल्यास व एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयाची राहील.

                                                            ***** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु