कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर देण्यासाठी लाभार्थी निवड
कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व
सोयाबीन टोकन यंत्र
50 टक्के अनुदानावर देण्यासाठी लाभार्थी निवड
*लातूर,दि.10(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील
सर्व शेतकरी यांनी जिल्हा परिषद लातूर
सेस फंडातून कडबा कुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण
यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी. तत्वावर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लातूर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वरील बाबीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जामधून
दि.18 ऑगस्ट, 2022 रोजी तालुका स्तरावर पंचायत समिती सभागृहात शेतकऱ्यांसमोर सोडत पध्दतीने
लाभार्थी निवड केली होती. निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या निवड यादीस जिल्हा
परिषद स्तरावरुन मंजूरी देण्यात आलेली आहे.
तरी कडबा कुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल
सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्रासाठी निवड झालेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत
समिती कार्यालयाकडील कृषि विभागाशी संपर्क साधावा व संबंधीत औजारे विहीत पध्दतीचा अपलंब
करुन तात्काळ खरेदी करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment