स्टँन्ड अप इंडिया योजने अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मीन योजना

 

स्टँन्ड अप इंडिया योजने अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील

धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मीन योजना

              *लातूर दि.4(जिमाका):-* इतर मागास बहुजन कल्याण शासन निर्णय क्रमांक सीबीसी-2019/प्रक्र-127/मावक दि. 6 सप्टेंबर, 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत भटक्या जामाती क प्रवर्गातील धनगर  समाजातील माहिलांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन  देणेबाबतची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

      सदर योजने अंतर्गत शासन निर्णय क्रमांक स्टॅडई-2020/प्र.क्र.23/अजाक दिनांक 09 डिसेंबर, 2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेले आहेत.सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

           सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन प्रस्ताव दिनांक  21ऑक्टोबर, 2022 पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचे कार्यालयात  सादर करावे असे आवाहन श्री. एस.एन. ‍चिकुर्ते  सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

 

                                        ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा