विमा संरक्षीत पिकाचे काढणीपश्चात घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत *नुकसानीची सुचना नुकसान झाल्यास विमा कंपनीस कळवावे* *-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन*

 

विमा संरक्षीत पिकाचे काढणीपश्चात घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत

*नुकसानीची सुचना नुकसान झाल्यास विमा कंपनीस कळवावे*

*-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन*

        लातूर,दि.14(जिमाका):- जिल्हृयामध्ये मागील काही दिवसापासुन सर्वदुर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिकांची काढणी अंतिम टप्यात असुन काही पिके शेतात उभी आहेत. काही शेतकऱ्यांनी काढणी केलेले पिके वाळवण्यासाठी शेतामध्ये तसेच ठेवलेले आहेत. अशा अधिसुचित पिकांचे गारपीठ, चक्री वादळ, चक्रीवादळामूळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी कोणत्याही बाबीमूळे पिक कापणी करुन सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत नुकसानीची सुचना सर्व प्रथम प्राधान्याने क्रॉप इंन्शुरन्स (Crop Insurance) मोबाईल ॲपद्वारे देण्यात यावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना व्यक्तीश: अर्ज, कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत व कार्यालया समोरील संभाव्य गर्दी होणार नाही. ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पूष्टी करुन संबंधीत शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आय.डी. मिळेल ज्याद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपद्वारेच पाहता येईल.

मोबाईल ॲपद्वारे शक्य न झाल्यास भारतीय कृषि विमा कंपनीच्या तालुका स्तरावर कार्यन्वित असलेल्या तालुका विमा कार्यालयात  देखील पूर्वसूचना देता येईल.

क्रॉप इंन्शुरन्स (Crop Insurance) मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर उपलब्ध असून मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य असल्याने ज्या शेतकऱ्यांचे काढणीपश्चात नुकसान झालेले आहे त्यांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधी/तालूका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा