मांजरा नदी जल संवाद यात्रेचे उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार शुभारंभ जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंग (ऑन लाइन) यांची प्रमुख उपस्थिती

 

मांजरा नदी जल संवाद यात्रेचे उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार शुभारंभ

जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंग (ऑन लाइन) यांची प्रमुख उपस्थिती

 


लातूर दि.१४ ( जिमाका ) महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,महासंस्कृती, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समिती, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मॅगसेस पुरस्कार विजेते, जल तज्ञ  डॉ.राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चला जाणूया नदीला अभियानांतर्गत मांजरा नदी जलसंवाद यात्रा शुभारंभ समारंभ माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी स.११.३० वा. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सार्वजनिक जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा विवेकानंद रुग्णालय, लातूरचे संस्थापक सदस्य पद्मभूषण मा.डॉ.अशोक कुकडे (काका) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मा.डॉ.अरविंद लोखंडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष तथा वैश्विक अवर्षण आणि पूर आयोगाचे अध्यक्ष मा.डॉ.राजेंद्रसिंग (ऑन लाइन), प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), लातूरचे मा.नितीन वाघमारे, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त मा.अविनाश देवसटवार, चला जाणूया नदीला अभियानातील नियोजन व अंमलबजावणी समितीतील अशासकीय सदस्य तथा मानवलोक संस्था, अंबाजोगाई येथील सचीव मा.अनिकेत भैय्या लोहिया आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांची उपस्थित लाभणार आहे. 

भारतीय संस्कृतीनुसार सजीव सृष्टी करिता पंचमहाभूतांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत या पंचमहाभूतांची पूजा करून त्यांचे आपल्या जीवनातील स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. जल हे या पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे. सजीवांच्या अस्तित्वासाठी पुरेशा स्वच्छ पाण्याची उपलब्धता न झाल्यास त्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही काळात नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळा अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे.  राज्यात गेल्या काही वर्षात निर्माण होणाऱ्या सततच्या आवर्षण परिस्थितीमुळे पाणी टंचाईचे संकट वाढत आहे. पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन पाण्याचा अपव्य टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्त्रोत नद्या व जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आणि  पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जागृती व साक्षरता निर्माण होण्याची गरज लक्षात घेता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच नद्या व जलाशय यांच्या माध्यमातून होणाऱ्या जल व हरित उत्पन्नाबाबत निदर्शनास आलेल्या या सर्व बाबी लक्षात घेऊन तसेच नदीबाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नदीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मॅगसेस पुरस्कार विजेते,वैश्विक पूर लोक आयोगाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सिंग आणि पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच ३६ जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी म्हणजे दि.१५.१०.२०२२ रोजी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नदी जलसंवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मांजरा नदीकाठी असलेल्या १०१ गावांमध्ये जलसंवाद यात्रेचे टप्पाटप्पाने दि.३० जानेवारी २०२३ पर्यन्त आयोजन करण्यात येणार आहे.

तेव्हा या कार्यक्रमाला लातूर जिल्हयातील जिल्हा परिषद कार्यालय, लातूर, लातूर शहर महानगरपालिका कार्यालय, लातूर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, लातूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय (पंचायत), लातूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर, कार्यकर्ता अभियंता, (छोटे पाच बंधारे), जिल्हा परिषद कार्यालय, लातूर, जिल्हा जलसंधारण अधिकारी (स्थानिक स्तर) कार्यालय, लातूर, वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालय, लातूर, आरोग्य उपसंचालक कार्यालय, लातूर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, लातूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालय, लातूर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, लातूर, जनसंपर्क आणि माहिती उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, लातूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व जिल्ह्यातील),कार्यकारी अभियंता, जलसंपदा कार्यालय (सर्व जिल्ह्यातील),  कृषी विज्ञान केंद्र, लातूर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, लातूर, जिल्हा खनी कर्म अधिकारी कार्यालय, लातूर, गटविकास अधिकारी (सर्व जिल्हे), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उपकेंद्र, लातूर, जिल्हा समन्वयक आणि सर्व रासेयो कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर, ५३ महाराष्ट्र बटालीयन कार्यालय, लातूर अधिकारी, एन.सी.सी.ऑफिसर्स आणि छात्र सैनिक, अधीक्षक अभियंता कार्यालय (सिंचन व्यवस्थापन), जलसंपदा विभाग, लातूर, जिल्हा वनरक्षक अधिकारी कार्यालय, लातूर, जिल्हा समन्वयक, नेहरू युवा केंद्र कार्यालय, लातूर, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, लातूर, माजी प्रांतपाल, डिस्ट्रिक्ट ३१३२, लातूर, सर्व महाविद्यालय प्राचार्य, (लातूर जिल्हा), देवराई प्रतिष्ठान, लातूर, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर, लातूर वृक्ष टीम, लातूर, कृषि  महाविद्यालय, लातूर आणि लातूर जिल्हयातील स्वयंसेवी संस्था अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते  शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, जलप्रेमी, जल संशोधक, जल अभ्यासक, समाजकार्यकर्ते आदिनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, लातूरचे नोडेल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन वाघमारे, चला जाणूया नदीला अभियानातील नियोजन व अंमलबजावणी समितीतील अशासकीय सदस्य डॉ.सुमंत पांडे, नरेंद्र चूग, जयाजी पाईकराव, रमाकांत कुलकर्णी, डॉ.गुरुदास नूलकर, अनिकेत लोहिया, राजेश पंडित, महेंद्र महाजन आणि मांजरा नदी संवाद यात्रा समन्वयक प्रा.डॉ.संजय गवई, सह समन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले  आणि सदस्य बालासाहेब सूर्यवंशी  यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु