राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; न्यायालयाने ठोठावला 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा दंड
*राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;*
*न्यायालयाने ठोठावला 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा दंड*
*लातूर दि.1(जिमाका):-* राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय
उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन
शुल्कचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 सप्टेंबर,
2022 ते दि. 29 सप्टेंबर,2022 कालावधीमध्ये पासून नोंदविलेल्या विविध अवैध मद्याचे
एकूण 16 गुन्हे नोंदविण्यात आले त्यामध्ये एकूण 31 आरोपींना अटक करण्यात आली.
सदर गुन्ह़यामध्ये एक दुचाकी व एक चारचाकी वाहनासह
रु. 4 लाख 6 हजार 520 (रु. 4,06,520/-) रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच दिनांक 29 सप्टेंबर,2022 रोजी रात्री अवैध
हॉटेल / धाबा मे. काश्मीर धाबा, औसा रोड, लातूर तसेच मे. शिवनेरी धाबा, औसा रोड लातूर
या ठिकाणी मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र
दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 अन्वये हॉटेल व मद्यपींवर कारवाई करण्यात आली.
मागिल नोंदविलेल्या गुन्ह़यापैकी अवैध
हॉटेल व धाबा मालाक व मद्यपींवर केलेल्या कारवाईमध्ये अवैध धाबा मालक व अवैध ठिकाणी
मद्यप्राशन करणाऱ्यांना न्यायालयाने रुपये
1 लाख 28 हजार 500 चा दंड ठोठावला आहे.
या कारवाईमध्ये प्रभारी अधीक्षक राउशु,
लातूर, निरीक्षक विभाग, अभिजित देशमुख, निरीक्षक-उदगीर
विभाग आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक आर. एम. चाटे, एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे,
स्वप्नील काळे, अ. ब. जाधव व सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. एल. कारभारी, गणेश गोले, जवान अनिरुध्द़ देशपांडे, हनमंत मुंडे, संतोष केंद्रे,
सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री तसेच मद्यपीं व अवैध
हॉटेल / धाबा विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास
टोल फ्री 18002339999 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नांव
गुप्त ठेवले जाईल असे प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अभिजित देशमुख लातूर यांनी
सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचेआवाहन
केले आहे.
****
Comments
Post a Comment