माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियानार्तंगत जिल्ह्यात 46 हजार 295 महिलांची आरोग्य तपासणी
माता
सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियानार्तंगत
जिल्ह्यात 46 हजार 295 महिलांची आरोग्य तपासणी
*लातूर दि.4(जिमाका):-* दि. 26 सप्टेबर
2022 पासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये
जिल्ह्यातील 18 वर्षा वरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी
करण्यात येत असून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक
अरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन
सेवा पुरविल्या जात आहेत
या मोहिमेमध्ये दररोज सकाळी 9 ते दुपारी
2 या कालावधीमध्ये उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रा.आ. केंद्र स्तरावर नवरात्र
कालावधीत माता व महिलांच्या तपासणीची शिबीरे
व आजारी महिलांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच उपकेंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर समुपदेशन करण्यात येत असून कार्यक्षेत्रातील
गरोदर स्त्रिया, माता व 18 वर्षावरील महिलांची
अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी
करून समुपदेशन केले जात आहे. या कार्यक्रमादरम्यान नवविवाहीत दांपत्यांची तपासणी करून
गर्भधारणापूर्व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याप्रमाणे कुटुंब कल्याण
कार्यक्रम व दोन अपत्यांमधील अंतराच्या फायदयांबाबत
मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय
व ग्रामीण रुग्णांलयात स्त्रीरोग तज्ञामार्फत 18 वर्षावरील महिलाची तपासणी करून स्त्रीरोग
आजाराच्या माता / महिलांच्या व जोखमीच्या माता यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे
विशेष सोनोग्राफी शिबीराचे आयोजन करून जास्तीत जास्त गरोदर माताची तपासणी करण्यात येत
आहे.
या अनुषंगाने जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभ
स्त्री रुग्णालय लातूर येथे दि. 27 सप्टेबर, 2022 रोजी आयोजीत करण्यात आले होते. या
मोहिमेमध्ये आजतागायत जिल्ह्यातील एकूण 46 हजार 295 महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार
करण्यात आले आहेत.
या अभियाना अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची
सभा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दि. 3 ऑक्टोबर, 2022 रोजी संपन्न झाली. यामध्ये
लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आरोग्य
तपासणी व उपचार करुन घ्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,मुख्य कार्यकारी
अधिकारी जि.प.अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एल. एस. देशमुख व जिल्हा माता व बाल
संगोपन अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment