सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडून साजरा
सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन
जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडून साजरा
*लातूर दि.19 (जिमाका)* दि.15 ऑक्टोंबर 2022 रोजी समाजिक न्याय विभागाच्या स्थापनेस 90 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे हा दिवस सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन व जागतिक अंध दिन (पांढरी काठी दिवस) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त, एस.एन चिकुर्ते, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बी.आर. पाटील, सहाय्यक संचालक प्रभाकर डाके, लेखा अधिकारी मनोज सकट, प्रादेशिक उपायुक्त, कार्यालय, लातूर यांच्या शुभहस्ते दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरीत करण्यात आले.
शासकीय अंध शाळा, लेबर कॉलनी लातूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये शहरातील अंध व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित होते. पांढरी काठी हा अंधाचा तिसरा डोळा म्हणून काम करीत असल्यामुळे पांढऱ्या काठीस अंधांचा तिसरा डोळा असे संबोधण्यात येते. या पांढऱ्या काठीचा वापर व महत्व या विषयावर अमोल निलंगेकर, विशेष शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. राजू गायकवाड, दिव्यांग विभाग प्रमुख यांनी अंध विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अंध विद्यार्थ्यासाठीच्या विविध शासकीय योजना व उच्च शिक्षणातील संधी, तसेच नव-नवीन अध्ययन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राम वंगाटे, कार्यालय अधिक्षक, समाज कल्याण विभाग लातूर व इतर मान्यतवरांच्या शुभ हस्ते शासकीय अंध शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व स्मार्ट केनचे वाटप करण्यात आले. बालासाहेब वाकडे, प्रभारी अधिक्षक, शासकीय अंध शाळा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
दि.15 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळां, अनु. जाती आश्रमशाळा व अनुदानित वसतिगृहामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कॅरम स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन व जागतिग पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळां, अनु. जाती आश्रमशाळा व अनुदानित वसतिगृहामध्ये शाळांतील निवासी विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन देण्यात आले.
Comments
Post a Comment