निलंगा तालुक्यातील भूकंपप्रवण गावे जसे हासूरी खुर्द, हासूरी बुद्रुक,हरी जवळगा,भूत मुगळी उस्तुरी ,बडूर या गावांमध्ये जनजागृती
*निलंगा तालुक्यातील भूकंपप्रवण गावे जसे हासूरी खुर्द,*
*हासूरी बुद्रुक,हरी जवळगा,भूत मुगळी उस्तुरी ,बडूर या गावांमध्ये जनजागृती*
या उपक्रमा दरम्यान भूकंपापासून बचाव
करण्याविषयी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. सदर जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी
पथनाट्य सादर करण्यात आले तसेच रॅली काढण्यात आली. सदरील माहिती भिंती पत्रक,माहितीपत्रक आणि बॅनर डिस्प्ले द्वारे
देण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक
डॉ. राजेश शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. साकेब उस्मानी, आपत्ती व्यवस्थापन
विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद पाटील आणि तसेच सामाजिक शास्त्र संकुल संचालक डॉ. कडेकर,
प्रा. करांडे, प्रा. प्रियंका निटुरकर, प्रा. मेघा साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमात सामाजिक
शास्त्र संकुल व आपत्ती व्यवस्थापन विभाग मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
****
Comments
Post a Comment