जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे मार्गदर्शन

 जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त

बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे मार्गदर्शन

         लातूर,दि.20 (जिमाका)-  जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमद्वारे बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे मानसिक आरोग्य व ताण तणाव व्यवस्थापनया विषयी कार्यशाळा नुकतीच पार पडली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठकडॉ. मोनिका पाटील डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेला बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूलचे प्राचार्य अमोल आडे, सुनिता मिसाळ, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमच्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती सरिता शेंडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमच्या जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटीकर, सामाजिक कार्यकर्त्या संध्या शेडोळे आदी उपस्थिीत होते.

             श्रीमती सरिता शेंडे यांनी विद्यार्थ्यामध्ये मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. माधुरी उटीकर यांनी विद्यार्थ्याना तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम व आजार व उपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव येथील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर अधिकारी व कर्मचारी टीम यांनी परिश्रम घेतले.


****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा