लातूरची शैक्षणिक पॅटर्न ओळख वाचन संस्कृती वाढवून अधिक समृध्द करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा - डॉ. शेषेराव मोहिते
लातूरची शैक्षणिक पॅटर्न ओळख वाचन संस्कृती वाढवून अधिक
समृध्द करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा - डॉ. शेषेराव मोहिते
लातूर दि.14 (जिमाका) आज देश महासत्ता होण्याच्या गोष्ट केल्या जातात. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मुलांमध्ये व समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविली पाहिजे, तरच समाज समृध्द होवू शकतो. महाराष्ट्रात लातूरची बाजारपेठ मोठी ती ओळख दूर होवून आज शैक्षणिक पॅटर्नची नगरी म्हणून ओळखली जात आहे. पण लातूरची ओळख वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा , अशी अपेक्षा डॉ. शेषेराव मोहिते यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे, डॉ. शेषेराव माहिते आदिंची यावेळी उपस्थिती होती.
पुणे व मुंबई या शहराची सुसंस्कारित शहरे म्हणून ओळख निर्माण करण्यात ग्रंथालयाचे
व वाचनाचे मोठे योगदान आहे. वाचनाने माणूस व समाज समृध्द होतो, असे उपजिल्हाधिकारी
(सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी सांगितले.
डॉ. शेषेराव मोहिते मराठी भाषेचे महत्वा सांगताना म्हणाले की, आपण भौतिक प्रगती
केली, म्हणजे बौध्दीक प्रगती नव्हे. बाल वयातील वाचनामुळे उज्जवल भविष्याचा पाया ठरतो.
यासाठी घरातील वातावरणामुळे घरामध्ये पुस्काचे एखादे कपाट असायला हवे. सधन व्यक्तीच
ग्रंथ खरेदी करण्याची आपल्या खर्चाकडे पाहत असतात. इतर बाबीवर खर्च करण्यासाठी मागे
पुढे पाहत असतात. त्यामुळे ग्रंथ खरेदी व वाचनाकडे आपला कल असायला हवा. देशाला महासत्ता
बनविण्यासाठी मनुष्यबळ हे सजग व शहाणे असणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यातील खेड्यापाड्यामध्ये
वाचन संस्कृती रुजली आहे, आणि ती वाचकांसाठी पोषक वातावरण आहे. याबरोबरच मुलांच्या
अभ्यासाचा ताण घालविण्याचे महत्वाचे साधन म्हणजे पुस्तके होय.
या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्रीमती वैशाली दुरुगकर यांनी केले, तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील
गजभारे यांनी आभार मानले. यावेळी वेदप्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
****
Comments
Post a Comment