अनुसूचित जातीतील गटाई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे गटई स्टॉल देण्याकरिता पूढील अटींची पुर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून 21 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत
अनुसूचित जातीतील गटाई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे
गटई स्टॉल देण्याकरिता पूढील अटींची पुर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून
21 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत
*लातूर दि.4(जिमाका):-*
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आसावा. अर्जदार अनुसूचित जातीचा आसावा, अर्जदाराचे उत्पन्न
ग्रामीण भागासाठी रुपये 40 हजार
व शहरी भागासाठी रुपये 50 हजार
असावे. अर्जदाराचे सक्षम अधिका-याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गटई स्टॉल लावण्याचे जागेचा आठ
अ उतारा अथवा भाडे करारनाम असणे आवश्यक आहे.
शंभर रुपये
चे बाँड पेपरवर विहीत नमुन्यातील करारनामा आवश्यक आहे.
वरिल प्रमाणे कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज भरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन,जुनी डालडा फॅक्टरी, गुळ मार्केट,
लातूर येथे सादर करावीत. अनुसूचित जातीचे गटई कामगारांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक
आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते
यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
***
Comments
Post a Comment