लातूर ऑफिसर्स क्लबचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

 

लातूर ऑफिसर्स क्लबचे

राज्यस्तरीय जलतरण  स्पर्धेत घवघवीत यश

 

        *लातूर,दि.13(जिमाका):-*  २३ व्या राज्य स्तरीय मास्टर जलतरण स्पर्धा दि. ८ ऑक्टोबर, २०२२ ते १० ऑक्टोबर,२०२२ रोजी नांदेड येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लबचे जेष्ठ सदस्य चंद्रकांत साळुंके वय ७४ वर्षे यांनी ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून नीलकंठ हेंबाडे यांनी ५० मी. १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच दि. ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी बार्शी जि. सोलापूर येथे खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते.

           या स्पर्धेत देखील ऑफिसर्स क्लब लातूरचे अॅडवान्स स्विमिंगच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात अभय देवकते ५० मी. फ्री स्टाईल प्रथम, १०० मी फ्री स्टाईल प्रथम ५० मी. बटर फ्लाय प्रथम अलोक मंठाळे ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम ५० मी. बॅक स्ट्रोक प्रथम, ५० मी फ्री स्टाईल द्वितीय, मयांक बंडे ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम ५० मी. बटरफ्लाय प्रथम ५० मी. फ्री द्वितीय आले असून या सर्व विद्याथ्यांना क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

ऑफिसर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत,  अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. सचिव तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, कोषाध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, सह सचिव डॉ. अजय जाधव, क्रीडा समिती प्रमुख क्लब व्यवस्थापक अजित भुतडा अनिल जैन आदीनी विजयी स्पर्धकांचा सत्कार व अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा