15 ऑक्टोंबर 2022 रोजी सामाजिक न्याय विभाग स्थापनादिन उत्साहात साजरा

  15 ऑक्टोंबर 2022 रोजी सामाजिक न्याय विभाग स्थापनादिन उत्साहात साजरा 

*लातूर दि.19 (जिमाका)*  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, हा 15 ऑक्टोंबर 1932 रोजी स्थापन करण्यात आलेला आहे. त्यास आता 90 वर्षे होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग प्रयत्नातून आणि परिश्रमातून व त्यांनी सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जोपासून समाज कल्याण विभागाची स्थापना केलेली आहे.   आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे  डॉ. प्रशांत नारनवरे, यांच्या सुचनेनुसार दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  

लातूर जिल्ह्यामध्ये  दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर व डॉ. बी.आर.पाटील, अध्यक्ष, दक्षिण मराठवाडा जेष्ठ नागरिक संघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

                  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहामध्ये मुख्य कार्यक्रम अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी.आर.पाटील, अध्यक्ष, दक्षिण मराठवाडा जेष्ठ नागरिक संघ, प्रकाश घादगिने, सचिव, जेष्ठ नागरिक संघ,  व डाके, सहाय्य संचालक, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, एस.एन.चिकुर्ते, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री. सकट, लेखाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर वर्धापन दिन निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेपासून सद्यस्थितीपर्यंतच्या इतिहासावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.

तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर व महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रम अरविंद लोखंडे, अपर जिल्हाधिकारी, लातूर  यांचे उपस्थित संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात फुले, शाहू, आंबेडकर या थोर समाजसुधारकाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा या उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचा अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत जात पडताळणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. लातूर यांचेकडील  विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पद्मभूषण पुरस्कार प्राप्त कुकडे काका, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. श्रीकांत गायकवाड,  विजयभाऊ राठी, डॉ. बी.एम. गोडबोले, डॉ. गुणवंत बिरादार, संजय गवई हे मान्यवर उपस्थित होते. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लातूर, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. लातूर या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमास महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविदयालयातील प्राध्यापक, विदयार्थी उपस्थित होते.

                                                           ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु