सन 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
सन 2022-23 शैक्षणिक
वर्षासाठी महाडिबीटी पोर्टल वर
नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
लातूर, दि.7(जिमाका):-
जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित/
विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये
प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती , विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष
मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांना कळविण्यात
येते की, सन 2022-23 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क, परीक्षा
शुल्क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी
संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी
हे पोर्टल दि- 22 सप्टेंबर 2022 पासून सुरु
करण्यात आलेले आहे.
सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी
यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवर खालील
वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक स्तर-कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम
(उदा. आकरावी, बारावी ) (सर्व शाखा,) (एमसीव्हीसी), आयटीआय इत्यादी. अर्जाचा प्रकार-
नवीन अर्ज, प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशीत करण्याकरीता प्रस्तावित मुदत संबंधित
महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचे करीता. दि. 22 स्पटेंबर, 2022 ते 8 ऑक्टोबर 2022
पर्यंत, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकरीता ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी मुदत दि. 22 सप्टेंबर 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत.
नुतणीकरणाचे अर्ज, दि. 22 सप्टेंबर 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 , सहायक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालयांकरीता ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी मुदत 22 सप्टेंबर 2022 ते 22 ऑक्टोबर
2022 पर्यंत.
वरिष्ठ महाविद्यालय बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (कला, वाणिज्य,
विज्ञान शाखा सर्व अभ्यासक्रम) सर्व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम नविन अर्ज दि. 22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत.
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकरीता ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी मुदत 22 सप्टेंबर
2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत. नुतनीकरणाचे अर्ज- 22 सप्टेंबर 2022 ते 15 ऑक्टोबर
2022 पर्यंत. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकरीता ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी
मुदत 22 सप्टेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत.
सर्व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम
(उदा. अभियांत्रीकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, नर्सी, ग. इ.) नवीन अर्ज- 22 सप्टेंबर,2022
ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकरीता ऑनलाईन अर्ज
मंजूर करण्यासाठी मुदत 22 सप्टेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत.नुतनीकरणाचे अर्ज
दि. 22 सप्टेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकरीता
ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी मुदत दि. 22 सप्टेंबर, 2022 ते 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत
राहील.
शासन निर्णय दि. 8 जाने 2019 मध्ये
नमुद केल्यानुसार संबंधित महाविद्यालयांत राबविण्यात येणारे अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्कांची मंजूरी, विद्यापिठांमार्फत दिली
जाणारी इतर शुल्काची मंजूरी व शैक्षणिक विभाग/शासकीय यंत्रणा यांचेकडून घेण्यात येणारी
मंजूरी या सर्व बाबींची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपीक
कर्मचारी यांची असल्याने सदरील कामकाजास प्राधान्य देण्यात यावे. महाविद्यालयामध्ये
Equal Opportunity Center (समान संधी केंद्र)
स्थापन करण्यात आलेले आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जाबाबतच्या अडचणी
सोडवाव्यात व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करावी आणि निर्धारित
वेळेत शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी पुर्ण करावी.
तेंव्हा सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी
यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास विहीत मुदतीत ऑनलाईन
सादर करावे. महाविद्यालय स्तरावर अथवा विद्यार्थी लॉगीनवर अर्ज प्रलंबित राहिल्यास
त्याची सर्वस्वी आर्थिक जबाबदारी संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्याची राहील याची सर्व
महाविद्यालयाच्या प्राचार्यानी व व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त
समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नीत
युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉन आधर युजर आयडी तयार करु नये.
नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण
केल्यास व एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी
व महाविद्यालयांची राहील.
000
Comments
Post a Comment