अंतर-महाविद्यालयीन युवक महोत्सवात कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

 

अंतर-महाविद्यालयीन युवक महोत्सवात

कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

 

*लातूर, दि.11(जिमाका)*  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अंतर-महाविद्यालयीन युवक महोत्सव, २०२२ चे आयोजन दि. ८ व ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी कृषि महाविद्यालय, सेलू येथे करण्यात आले होते.

या महोत्सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या विविध घटक व संलग्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या युवक महोत्सवामध्ये लातूर येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी चार सांस्कृतिक कला प्रकारामध्ये सहभाग घेऊन चारही कला प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. समूह नृत्यामध्ये कु. प्रतीक्षा खेडकर, कु. मयुरी गणवीर, कु. प्रतिभा दिवे, कु. अपूर्वा शेल्हाळकर, कु. गीताश्री जाधव, कु. शुभदा शिराळ, कु. स्नेहल सपाते, कु. सुहर्षा वसमतकर, कु. कीर्ती गवाले आणि कु. स्वाती काळे यांनी उत्कृष्ट होजागिरी नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. तसेच कु.स्वाती काळे, कु. शुभदा शिराळ, कु. स्रेहल सपाते, कु. कीर्ती गवाले, कु. गीताश्री जाधव आणि कु. मयुरी गणवीर, या विद्यार्थिनीनी मूक अभिनय सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या व सुवर्ण पदक पटकावले. तिसऱ्या कला प्रकारामध्ये कु. प्रतीक्षा खेडकर, कु.प्रतिभा दिवे व कु.अपूर्वा शेल्हाळकर यांनी पार्टनर ही एकांकिका सादर केली व प्रेक्षकांची मने जिंकली, मोनो अॅक्टिंग या कला प्रकारामध्ये कु. कल्पना वाघमोडे हिने मी "सावित्री बोलतेय" हा एकपात्री प्रयोग सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

या सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व

प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. भागवत इंदुलकर, डॉ. दिनेशसिंग चव्हाण, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ.विजय भामरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. संतोष कांबळे, डॉ. पद्माकर वाडीकर व महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

          तसेच यशस्वी विद्यार्थींनींना कला प्रकारचे प्रमुख डॉ. विलास टाकणखार, डॉ. विठोबा मुळेकर, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. दयानंद मोरे, डॉ. संघर्ष शृंगारे व सौ. माया भिकाणे तसेच प्रशिक्षक म्हणून सुरेंद्र अपसिंगेकर, कल्याण वाघमारे, दयानंद सरपाळे, स्वप्नील कोरे आणि तुकाराम सुवर्णकार यांनी मार्गदर्शन केले.



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु