जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण कार्यालयात

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन

 




लातूर,दि.21 (जिमाका)- जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण कार्यालयात झाली. प्राधिकरणच्या सचिव न्या. श्रीमती स्वाती अवसेकर यांनी प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

कायदे व न्याय व्यस्थेची माहिती सामान्य लोकांना व्हावी. समाजातील वंचित, दिव्यांग आणि अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळावा. दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या योजनांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे न्या. श्रीमती अवसेकर यांनी सांगितले.

संवेदना प्रकल्पाचे विशेष शिक्षक तथा स्नॅकचे समन्वयक व्यंकट लामजने यांनी दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या युडीआयडी कार्ड, निरामय आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, 5 टक्के दिव्यांग निधी, समाजकल्याण विभागाच्या योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

सुत्रसंचालन अॅड. तौफीक तांबोळी यांनी केलेअॅड.अविनाश मालवे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके,  दिव्याग स्नेहबंध, दिव्यांग प्रतिष्ठान, सक्षम लातूर या संस्थांचे इस्माईल शेख, अमोल गव्हाणे, श्रीमती ज्योती मारडेकर, श्रीमती सुनिता आयरेकर यांनी परिश्रम घेतले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु