ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका-2022 मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर काही आक्षेप असल्यास ते संबंधीत तहसील कार्यालयामध्ये दाखल करावेत*
*ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका-2022 मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर*
*काही आक्षेप असल्यास
ते संबंधीत तहसील कार्यालयामध्ये दाखल करावेत*
*लातूर,दि.13(जिमाका):-* मा. राज्य
निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेश दिनांक ४ ऑक्टोबर, २०२२ अन्वये लातूर जिल्ह्यातील
माहे ऑक्टोबर, २०२२ ते डिसेंबर, २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ३५१ ग्रामपंचायत
सार्वत्रिक निवडणुका-२०२२ मतदार यादीचा कार्यक्रम देण्यात आलेला आहे. सदरील
कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
निवडणूकीचा टप्पा व टप्पा
सुरु करण्याची / पूर्ण करण्यासाठी तारीख पूढील प्रमाणे आहे. प्रभागनिहाय प्रारुप
मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरुवार 13 ऑक्टोबर, 2022, हरकती व सूचना
दाखल करण्याचा कालावधी गुरुवार, दि. 13 ऑक्टोबर, 2022 व मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर,
2022 व प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर, 2022
असणार आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या
कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यामधील (३५१) ग्रामपंचायतींची
प्रारुप मतदार यादी दिनांक १३ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदरील प्रारुप मतदार यादीचे अवलोकन करुन त्यावर काही आक्षेप असल्यास ते संबंधीत
तहसील कार्यालयामध्ये दिनांक १३ ऑक्टोबर, २०२२ ते १८ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये
कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे आवाहन
जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडून करण्यात येत आहे.
*****
Comments
Post a Comment