शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 भरावे

 

शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या

कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 भरावे

            *लातूर दि.4(जिमाका):-*  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयाचे मनुष्यबळाचे ३० सप्टेंबर 2022 अखेर संपणा-या तिमाहीचे ईआर-1 हे विवरणपत्र 30 ऑक्टोबर,2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे असे  आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,लातूर यांनी केले आहे.

            सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारी ) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतूदीनुसार शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचा-यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपताच पुढील 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) ऑनलाईन पध्दतीने दिनांक 30 ऑक्टोबर २०२२ पर्यन्त भरावे.

             ज्या उद्योजक / आस्थापना यांना ऑनलाईन व्दारे विवरणपत्र भरताना अडचणी येत असतील तर त्यांनी कार्याल्याचा दूरध्वनी क्रमांक 02382- 299462 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे

 

                                                       ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा