अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या

 घटकांकरिता मार्जिन मनी योजना

 

              *लातूर दि.4(जिमाका):-* शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. 8 मार्च, 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.

         या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टँडई-2020/प्र.क्र.23/अजाक, दि. 09 डिसेंबर, 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेले आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

          या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन प्रस्ताव दिनांक  21 ऑक्टोबर,2022 पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचे कार्यालयात  सादर करावे असे आवाहन  समाज कल्याण सहायक आयुक्त एस.एन. ‍चिकुर्ते  यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                             ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा