केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३ साठीची ऑनलाइन अर्ज करावेत*

 

*केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना*

*सन २०२२-२३ साठीची ऑनलाइन अर्ज करावेत*

§  *ऑनलाईन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम दि. 30 नोव्हेंबर, 2022*  

 

*लातूर, दि.12(जिमाका) :-* जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबीत यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ साठी पंतप्रधान शिष्यवृत्ती  मिळणेसाठीची प्रकरणे www.ksb.gov.in वेबसाईट्वर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे.

इयत्ता बारावी किंवा पदवीका (Diploma) मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोर्सेसची यादी ऑनलाईन पहावी. प्रवेश घेतलेल्या  माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यास मुलीस रुपये ३६ हजार व मुलास रुपये ३० हजार एवढी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरण्याची शेवटची दि. ३० नोव्हेंबर, २०२२ अशी आहे.

लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पात्र पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज विहीत मुदतीत भरण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांनी आवाहन केले आहे. अधिक माहीती www.ksb.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु